Satyajeet Tambe

MLC, Nashik Graduate Constituency
Maharashtra

Satyajeet Tambe

MLC, Nashik Graduate Constituency
Maharashtra

  • मुख्य पृष्ठ
  • अधिक माहिती
    • प्रोफाईल
    • गॅलरी
    • फोकस क्षेत्रे
    • जय हिंद
    • मीडिया किट
  • दौरा
  • माध्यमे
  • अभिप्राय
    • अभिप्राय फॉर्म
    • अभिप्राय निकाल
  • संपर्क
    • संपर्क
    • स्वयंसेवक

गॅलरी

  • मुख्य पृष्ठ
  • गॅलरी
आज सत्यजीत तांबे यांनी अमळनेर तालुक्यात आभार दौऱ्यावर असताना 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' असा संस्कार देणाऱ्या साने गुरुजींच्या कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानला भेट दिली. यावेळी तेथील प्रसन्न व शांत वातावरणात सत्यजीत तांबे यांनी साने गुरुजींनी लिहिलेली काही पुस्तके चाळली. यावेळी सत्यजीत तांबे यांनी ट्रस्टचे चेतनभाऊ सोनार, गोपाळ नेवे, डॉ. अतुल चौधरी व दर्शनाताई या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
 

नवापूर तालुक्यातुन सत्यजीत तांबे यांच्या आभार दौऱ्यास मिळतोय उदंड व उत्स्फूर्त प्रतिसाद! 

नंदुरबारच्या मा.जि.प.अध्यक्षा 

रजनीताई शिरीषकुमार नाईक, युवा नेते डॉ.नचिकेत नाईक, डॉ. हर्षाली नचिकेत नाईक, युवक काँग्रेस अध्यक्ष पराग नाईक, युवक काँग्रेस उपाध्यक्ष आश्विन वसावे, दिलीप पवार, चेतन वसावे, अमोल गावित या सर्वांनी सत्यजीत तांबे यांचे सहर्ष स्वागत केले. सत्यजीत तांबे यांनी सर्वांची आपुलकीने विचारपूस केली व सर्वांचे आभार मानले.
नवापूर तालुक्यातील वतन अग्रवाल सरांच्या घरी सत्यजीत तांबे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी सत्यजीत तांबे यांनी कुटुंबियांशी मनमोकळे पणाने संवाद साधला.
आज पुन्हा सत्यजीत तांबे यांच्या आभार दौऱ्यास त्याच जोशाने सुरुवात झाली आहे. नवापूर तालुक्यातील वैभव गोसावी सरांच्या निवासस्थानी सत्यजीत तांबे यांनी सदिच्छा भेट दिली असता गोरावी परिवाराकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. सत्यजीत तांबे यांच्यातील अभ्यासू वृत्ती, लोकसेवेची तळमळ पाहून गोसावी सरांनी त्यांना पदवीधर निवडणुकीत खंबीर साथ दिली होती
नगरचे शिवसेना उपशहर प्रमुख पै. संदिप दातरंगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सत्यजीत तांबे यांनी भेट दिली. याप्रसंगी संदीपभाऊ दातरंगे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सुनिल सुडके, अविनाश लोंढे, गणेश लांडगे, शुभम दातरंगे आदी उपस्थित होते.
तांबे व खडसे परिवाराचे अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. माजी मंत्री व आ.एकनाथ खडसे साहेब व डॉ.सुधीर तांबे साहेबांचे सुद्धा समाजकारणाच्या माध्यमातून अत्यंत घनिष्ठ असे मैत्रीचे संबंध आहेत. आता हेच ऋणानुबंध पुढे घेऊन जाण्याचे काम सत्यजीत तांबे करताना दिसत आहेत. 

जळगाव जिल्ह्याच्या आभार दौऱ्यावर असताना सत्यजीत तांबे यांनी आवर्जून रोहिणीताई एकनाथराव खडसे यांची भेट घेतली. रोहिणीताई आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूत गिरणीच्या चेअरमन पदी उत्तम काम करत आहेत. सत्यजीत यांनी रोहिणीताईंची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी रोहिणीताई व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सत्यजीत तांबे यांचे स्वागत केले. 

सर्वांशी संवाद ठेवून काम करण्याचा डॉ.सुधीर तांबे यांचा स्वभाव होता. अगदी त्या स्वभावात साजेशीच सत्यजीत तांबे यांच्या कामाची पद्धत आहे. त्यामुळे तांबे परिवाराचे या मतदारसंघातील जनतेशी असलेले ऋणानुबंध आणखी वृद्धिंगत करण्याचे काम सत्यजीत तांबे यांच्या हातून घडेल, हा विश्वास आहे.
 

सत्यजीत दादा तांबे 

जनसेवेसाठी सदैव तत्पर ! 

सत्यजीत तांबे हे मतदारसंघातील नागरिकांना भेटण्यासाठी नेहमी उपलब्ध असतात. त्यांना भेटायला येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न, समस्या ते आपुलकीने समजून घेतात आणि त्या सोडविण्यासाठी तळमळीने प्रयत्नही करतात. त्यांच्या रूपाने नाशिक पदवीधर मतदारसंघाला आणखी एक कार्यक्षम आणि प्रामाणिक आमदार लाभला आहे.
 

युवकांनी व्यवसायात यावं असं फक्त भाषणबाजी करणारा नव्हे तर प्रत्यक्ष युवा उद्योजकांना भेटून त्यांना प्रोत्साहन देणारा नेता नव्हे तर युवा मित्र! 

कान्हूर पठार (पारनेर) येथील युवा उद्योजक मनोज झावरे यांच्या 'मनराही - ग्रुप ऑफ कंपनीज' या कार्यालयास सत्यजीत तांबे यांनी सदिच्छा भेट दिली. चांगल्या गुणवत्तेचा गूळ तयार करणाऱ्या या युवा उद्योजकास सत्यजीत तांबे यांनी पाठीवर कौतुकाची थाप दिली व व्यवसाय समृद्धीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.
संगमनेरमधील भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मच्छिंद्र यादव दिघे यांचा सेवापूर्ती गौरव सत्कार सोहळा तसेच ‘लोकनेते बाळासाहेब थोरात सभागृह व अटल लॅब’चे उद्घाटन आज माजी महसूल मंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी डॉ. सुधीरजी तांबे, सत्यजीत तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, सौ. कांचनताई थोरात, डॉ. जयश्रीताई थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
संगमनेर तालुका प्रशासनाची ‘टंचाई व खरीप हंगामपूर्व आढावा बैठक’ माजी महसूल मंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे, अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह विविध पदाधिकारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आज सत्यजीत तांबे यांनी संगमनेर शहरात विविध ठिकाणी सदिच्छा भेटी दिल्या. यावेळी प्रत्येक ठिकाणी त्यांचे अगदी उत्साहात आणि प्रेमाने स्वागत झाले.
आज संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे संतसावली निवासस्थानी मंदिरात श्रीदत्तमुर्तीची स्थापना तसेच श्रीदत्त मंदिर, प्रवरातीर येथील कलशारोहण सोहळा महंत श्री रामगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते व आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगलमय वातावरणात पार पडला. या मंगलप्रसंगी उपस्थित राहून सत्यजीत तांबे यांनी श्री गुरुदत्तांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी इंद्रजीत थोरात, रणजित देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
लाखो तरुणांना एका नव्या भविष्याची शाश्वती देणारं आश्वासक युवा नेतृत्व!
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांच्या आभार दौऱ्यादरम्यान बागलाण तालुक्याच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या या कार्यक्रमाला पदवीधर बांधव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चाळीसगावच्या राष्ट्रीय कन्या शाळा व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य डॉ. साधनाताई निकम यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा सत्यजीत तांबे यांच्या उपस्थितीत आज पार पडला. विविध सामाजिक उपक्रम, कलाक्षेत्रातील उपक्रम यांमध्ये अग्रेसर असलेल्या डॉ. निकम यांना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळालेले आहेत. यावेळी आपल्या मनोगतातून सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
राहाता तालुक्यातील अस्तगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री. वसंत शिंदे यांचा सेवापुर्ती व कृतज्ञता सोहळा सत्यजीत तांबे यांच्या उपस्थितीत पार पडला.
इस्लामपूरमधील आदर्श करिअर अकॅडमी बहादुरवाडी येथे सत्यजीत तांबे यांनी सदिच्छा भेट दिली. ही अकॅडमी मागील 26 वर्षे तरुणांना सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण देऊन भारताला सैनिक व पोलिस घडवून देते आहे.
जनता जनार्दन पाठीशी, मज काय कुणाची भीती!
आपल्या सातारा दौऱ्यात सत्यजीत तांबे यांनी कराडमधील स्व. यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतिस्थळ (प्रितीसंगम) येथे आवर्जून भेट दिली व स्मारकास अभिवादन केले.
पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात सातऱ्यात गेले असताना सत्यजीत तांबे यांनी आवर्जून मा. खा. उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. खा. उदयनराजे भोसले यांनी हसतमुखाने सत्यजीत तांबे यांचा सत्कार व स्वागत केले.
बंसल क्लासेसच्या संगमनेर शाखेच्या शुभारंभास सत्यजीत तांबे यांनी उपस्थित राहून संचालक व संगमनेरच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
साकुर येथील वीरभद्र बिरोबा देवस्थान परिसराच्या सुशोभीकरणासाठी सत्यजीत तांबे यांनी नुकतेच 50 लक्ष मंजूर करून आणले. सत्यजीत यांनी बिरोबा देवस्थानास सदिच्छा भेट दिली असता ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. सत्यजीत दादांनी देवस्थान परिसराची पाहणी केली व वीरभद्र बिरोबाचे मनोभावे दर्शन घेतले.
कोपरगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे, श्री रामेश्वर विद्यालय, वारीचे मुख्याध्यापक श्री. छबू पाळंदे सर यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यास सत्यजीत तांबे यांनी उपस्थिती दर्शवली. 34 वर्षे शिक्षण क्षेत्रात व संस्थेत प्रदीर्घ सेवा देणाऱ्या पाळंदे सरांना त्यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मागील महिन्यातच संगमनेरच्या श्री आवजीनाथ बाबा देवस्थान परिसराच्या सुशोभिकरणासाठी सत्यजीत तांबे यांनी 50 लक्ष रुपये निधी मंजूर करून दिला होता. आज संगमनेर तालुक्याच्या आभार दौऱ्यादरम्यान त्यांनी आवर्जून येथे भेट दिली, व मनोभावे दर्शन घेतले. देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
स्वकुल साळी समाज, संगमनेर तर्फे सत्यजीत तांबेंचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला. मतदारसंघाचं नेतृत्व करताना समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन जाण्याचं काम सत्यजीत तांबे करत आहेत.
सत्यजीत तांबे यांनी आज नाशिकमधील 'इस्प्लायर द हेरीटेज स्कूल'ला भेट दिली. शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग त्यांनी या शाळेत पाहिला. यावेळी या शाळेचे संचालक श्री. सचिन जोशी व त्यांच्या पत्नी उषा जोशी उपस्थित होत्या.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ व सेवानिवृत्त सेवकांचा स्नेह मेळाव्यात सत्यजीत दादा तांबे !
नेता नव्हे युवा मित्र !
सत्यजीत तांबे यांची एक्स्पो 2023 बिजनेस एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सवाला भेट! महोत्सवातील विविध लघुउद्योगांच्या प्रदर्शनाचेही कौतुक…

समाजमाध्यमांवर आमच्याशी संपर्क साधा​


सत्यजीत तांबे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. ते अपक्ष म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. अगदी तळागाळापासून आपल्या कामाला सुरुवात करून ते गेल्या 23 वर्षांपासून संघटनात्मक आणि निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय आहेत.

  • 401, कालिका प्राईड,
    स्वास्थ्य हॉस्पिटल जवळ,
    लालटाकी, अहमदनगर,
    महाराष्ट्र-414 001
  • 02425-225688
    98220-61332
  • office@satyajeettambe.com
Quick Links
  • Home
  • Gallery
  • News
  • Event
  • Contact
  • Volunteer
  • Jaihind Lokchalwal
Useful Links
  • Privacy Policy
  • FAQ

Copyright © 2024 Satyajeet Tambe. All Rights Reserved. Designed & Maintained by ProNeta Tech